June 17, 2025 6:45 PM June 17, 2025 6:45 PM
9
विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री फडनवीस यांना निमंत्रण
यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनं मुंबईत त्यांची भेट घेऊन निमंत्रण दिलं आहे. येत्या ६ जुलै रोजी पहाटे २ वाजून २० मिनिटांनी मुख्यमंत्री फडनवीस सपत्निक, तसंच मानाच्या वारकरी जोडप्यासह विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करतील.