November 15, 2025 7:23 PM

views 20

गुजरातमध्ये ९ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन

 आदिवासींची अस्मिता हजारो वर्षांच्या भारतीय जाणीवांचा अविभाज्य भाग आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी समुदायाचे नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यातल्या देडियापाडा इथं एका कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी ९ हजार ७०० कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या विकास योजनांच्या माध्यमातून या भागातल्या आदिवासी समाजाला शिक्षण, आरोग्य आणि पा...