September 17, 2024 7:39 PM September 17, 2024 7:39 PM
3
‘विश्वशांतीदूत वसुधैव कुटुंबकम’ गीताचं दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे लोकार्पण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे विश्वशांती दूत वसुधैव कुटुंबकम् या गाण्याचं आज मुंबईत लोकार्पण करण्यात आलं. पंडीत हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी हे गीत गायलं आहे. यानिमित्त हिंगोली जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांगांना साहित्य वाटप झालं. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.