January 31, 2025 7:51 PM January 31, 2025 7:51 PM

views 11

तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला पुण्यात प्रारंभ

कृत्रिम बुध्दिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाला न घाबरता त्या तंत्रज्ञानाचा उपयोग मराठी भाषेचा विकास आणि समृद्धीसाठी कसा करता येईल, यादृष्टीने विचार करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.    मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. याच मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून साद घालत आहोत, असं ते म्हणाले. मराठी भाषेची स...