September 9, 2024 7:02 PM September 9, 2024 7:02 PM
13
राज्य विधानसभा निवडणुकीत १६० जागा लढवून १२५ जागा जिंकण्याचं भाजपाचं लक्ष्य
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपानं १६० जागा लढवाव्या. त्यातल्या किमान १२५ जागा जिंकण्याचं उद्दिष्ट पक्षानं ठेवावं यावर भाजपाच्या कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री मुंबईत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी जागावाटपाची अनौपचारिक चर्चा सुरू झाली आहे. पण त्यांना ७० हून अधि...