May 12, 2025 1:18 PM May 12, 2025 1:18 PM
11
क्रिकेटपटू विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. विराटने आत्तापर्यंत १२३ सामन्यांमध्ये ४६ पूर्णांक ८५ शतांशच्या सरासरीने ९ हजार २३० धावा केल्या आहेत. त्याच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर विराट हा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज बनला. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपल याच्यानंतर कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतकं करणारा विराट कोहली दुसरा क्रि...