January 1, 2025 2:30 PM January 1, 2025 2:30 PM

views 2

मणिपूरमधल्या हिंसाचारामुळे स्थलांतरित व्हावं लागलेल्या नागरिकांना राज्य सरकार ५०हजार रुपयांपर्यंतचं कर्ज विनातारण देणार

मणिपूरमधल्या हिंसाचारामुळे स्थलांतरित व्हावं लागलेल्या नागरिकांना राज्य सरकार ५०हजार रुपयांपर्यंतचं कर्ज विनातारण देणार आहे. मुख्यमंत्री उद्योजकता सहाय्य योजनेतून हे कर्ज देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी काल केली. या योजनेअंतर्गत याआधीच ४२६ लोकांना व्यवसायासाठी कर्ज दिल्याचं त्यांनी सांगितलं.

December 3, 2024 2:23 PM December 3, 2024 2:23 PM

views 8

गिनी देशात फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि चेंगराचेंगरीच्या घटनेत ५६ जणांचा मृत्यू

गिनी देशात एनझेरेकोर शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि चेंगराचेंगरीच्या घटनेत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकार सर्वप्रकारची मदत करत असल्याचं सांगून गिनीचे राष्ट्राध्यक्ष मामाडी डौम्बोया यांनी मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. दुर्घटनेची कारणं शोधण्यासाठी प्रधानमंत्री अमादोउ ओरी बाह यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे.

September 18, 2024 7:48 PM September 18, 2024 7:48 PM

views 2

मेक्सिकोच्या सिनलोआ राज्यात उसळलेल्या हिंसाचारात जवळपास ३० जणांचा मृत्यू

मेक्सिकोच्या सिनलोआ राज्यात उसळलेल्या हिंसाचारात जवळपास तीस जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जवान शहीद झाले आहेत. हिंसाचार उसळलेल्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं मेक्सिकोचे संरक्षण मत्री लुईस क्रेसेनसियो सँडोवल यांनी सांगितलं. पोलिसांनी ३० संशयितांना अटक केली असून ११५ बंदुका जप्त केल्या आहेत. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन गटात संघर्ष उफाळून आल्यानंतर या हिंसाचाराला तोंड फुटलं होतं.

July 18, 2024 3:00 PM July 18, 2024 3:00 PM

views 6

हिंसाचार आणि हत्या अशा शब्दांचा वापर अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी केला जातो हे दुर्दैवी -भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी

हिंसाचार आणि हत्या अशा शब्दांचा वापर अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी केला जातो हे दुर्दैवी असल्याचं भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं आहे.ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नकारात्मक राजकीय वातावरण, देशाची सुरक्षा आणि त्याचा परिणाम याकडेही लक्ष वेधलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेक वेळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी केला.