November 22, 2024 7:58 PM

views 14

नालासोपारा प्रकरणात विनोद तावडे यांचा काँग्रेसविरोधात मानहानीचा दावा

भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी नालासोपारा प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही सत्य सर्वांच्या समोर आहे, असं तावडे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. कथित ५ कोटी रुपये निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या तपासात कुठेच सापडले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामुळे काँग्रेसचं खालच्या दर्जाचं राजकारण आणि देशाला दिशाभूल करण...

November 19, 2024 7:47 PM

views 26

पैसे वाटप प्रकरणी भाजपा नेते विनोद तावडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पालघर जिल्ह्यात नालासोपाऱ्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाली आहे. प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाच्या बाहेरील राजकीय व्यक्तीला तिथे थांबता येत नाही. या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. तावडे पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ बहुजन विकास आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध केला होता. हॉटेलची तपासणी केल्यानंतर निवडणूक यंत्रणेला ९ लाख ९३ हजार ५०० रुपये आणि काही कागदपत्रं सापडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया...

November 19, 2024 3:17 PM

views 15

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप

पालघर जिल्ह्यात नालासोपाऱ्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला आहे. तावडे कथितरित्या पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. बविआ कार्यकर्त्यांना असाच गैरसमज झाला आहे. तरीही कुणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाकडून चौकशी व्हावी असा आपलाही आग्रही आहे, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली आहे.   याप्रकरणी भाजपा आणि तावडे यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नोटब...

November 18, 2024 7:39 PM

views 20

धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या सर्व रहिवाशांना धारावीतच घर देण्यात येईल-विनोद तावडे

धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या सर्व रहिवाशांना धारावीतच घर देण्यात येईल, असं भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगितलं. धारावीतल्या लोकांना विस्थापित करण्यात येणार आहे, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. धारावीची जमीन अदानी समूहाला दिली जाणार नाही, ती राज्य शासनाच्याच ताब्यात राहील, असं तावडे यांनी स्पष्ट केलं.

November 12, 2024 7:15 PM

views 18

कोकणात महायुतीला ६०हून अधिक जागा मिळतील – विनोद तावडे

लोकसभा निवडणुकीत मविआने फेक नॅरेटिव्ह तयार केला होता. पण विधानसभेवेळी मतदारांनी हा डाव ओळखला आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणात महायुतीला साठहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज कणकवली इथे व्यक्त केला.