January 4, 2026 2:30 PM January 4, 2026 2:30 PM

views 10

जीरामजी योजनेबद्दल काँग्रेसने संभ्रम पसरवू नये असं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं आवाहन

विकसित भारत जी रामजी योजना पूर्वीच्या मनरेगा योजनेच्या तुलनेत अधिक पारदर्शक आणि कल्याणकारी असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान आंनी आज सांगितलं. या योजनेबद्दल काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मनरेगा योजनेसाठी प्रचंड आर्थिक तरतूद करुनही त्यातून दीर्घकालीन विकासाचं काम होऊ शकलं नाही, कारण त्यात भ्रष्टाचार होता असं ते म्हणाले. पूर्वीच्या योजनेपेक्षा जास्त दिवस काम देण्याची तरतूद जीरामजीमधे आहे, तसंच काम देता आलं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची किंवा कामाचे पैसे वे...