June 11, 2025 8:42 PM June 11, 2025 8:42 PM

views 11

परभणीत शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन

विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्यावतीनं परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्यात आव्हाई इथे शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर पिकणाऱ्या नगदी पिकांविषयी शास्त्रज्ञांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाविषयी परभणीचे शेतकरी जळबाजी बुचाले यांनी अधिक माहिती दिली.   कृषी विभाग सांगली तसंच आत्मा प्रकल्प सांगली यांच्या संयुक्त प्रयत्नातून मिरज तालुक्यात शिपूर इथंही “कृषी संकल्प...

May 30, 2025 9:25 AM May 30, 2025 9:25 AM

views 35

कृषी क्षेत्राचा विकास हे विकसित भारताच्या उभारणीतील महत्त्वाचं पाऊल – प्रधानमंत्री

देशाच्या कृषी क्षेत्राचा विकास हे विकसित भारताच्या उभारणीतील एक महत्त्वाचं पाऊल ठरेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओडिशामध्ये केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा प्रारंभ झाला. त्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर व्हिडिओ संदेश प्रसारित केला. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा; कृषी अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना करत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.

May 29, 2025 3:33 PM May 29, 2025 3:33 PM

views 14

संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटन

आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत झालं. वातावरण बदलामुळे शेती पारंपरिक पद्धतीने करता येत नाही तिच्यात गुंतवणूक होणं आवश्यक आहे, मात्र ७९ टक्के शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्याच्यात गुंतवणूक करण्याची क्षमता नाही. अशा दुष्टचक्रात शेतकरी अडकल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या दुष्टचक्रामधून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी योजना आखून सरकार प्रयत्न करत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.