June 3, 2025 3:16 PM June 3, 2025 3:16 PM
7
कृषी क्षेत्रात होणारं संशोधन शेतकऱ्यांच्या आवाक्यात असावं यासाठी सरकार प्रयत्नशील – कृषिमंत्री
कृषी क्षेत्रात होणारं संशोधन शेतकऱ्यांच्या आवाक्यात असावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. कृषीमंत्री आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी नारायणगांव इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. बनावट बियाणं आणि खतांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयाला भेट दिली आणि तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यास...