May 10, 2025 1:30 PM May 10, 2025 1:30 PM
9
प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन
ज्येष्ठ रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. पानिपत, बेल बॉटम, उरी, दंगल, पिके यासारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी, तर पावनखिंड, फत्ते शिकस्त, शेर शिवराज यासारख्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केलं. विक्रम गायकवाड यांना सात वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. आज दुपारी मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.