September 6, 2024 12:44 PM September 6, 2024 12:44 PM
15
आंध्रप्रदेशातल्या बुडामेरू कालव्यातील भगदाड पडल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर तैनात
आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथल्या बुडामेरू कालव्याला भगदाड पडल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर तैनात करण्यात आले आहेत. राज्य सरकारने लष्कराकडे मदत मागितल्यानंतर लष्करी अभियंता कृती दलाच्या ४० अभियंत्यांना हवाई मार्गाने विजयवाडा इथं नेण्यात आलं आहे. सैन्याच्या अतिरिक्त तुकड्याही तैनातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. भगदाड बुजवण्यासाठी, पूरस्थितीचं निरीक्षण करण्यासाठी आणि पूरबाधित रहिवाशांचं स्थलांतर करण्यासाठी स्थानिक प्रशासन आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचा...