October 2, 2025 3:13 PM October 2, 2025 3:13 PM

views 64

देशभरात विजयादशमीचा उत्साह

आश्विन शुद्ध दशमी - विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण  आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीने शस्रपूजा करून साजरा होत आहे. नवरात्रौत्सवाचा समारोप करणारा हा सण महाराष्ट्रात शिलंगणाचं सोनं लुटून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या सणाला नवीन खरेदी केली जाते.  मात्र अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराचं सावट सणावर जाणवत आहे. पिकांचं आणि फूलपिकांचं नुकसान झाल्यामुळे फुलं तोरणं यांच्या प्रमाणात घट झाली आहे.    विजया दशमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा देताना म्हटलं ...

October 2, 2025 9:21 AM October 2, 2025 9:21 AM

views 72

देशभरात विजयादशमीचा उत्साह, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना 121 व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 156 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. समाजमाध्यमावरून दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी, लाल बहादूर शास्त्री यांच्या सचोटी, नम्रता आणि दृढनिश्चयाने आव्हानात्मक काळात राष्ट्राला बळकटी मिळाल्याचं नमूद केलं. तर ज्यांच्या आदर्शांमुळे मानवी इतिहासाचा मार्ग बदलला अशा असाधारण जीवनाला आदरांजली वाहण्याची संधी म्हणजे गांधी जयंती. गांधीजींच्या विचारसरणीचा गौरव करताना, धैर्य आण...

October 13, 2024 9:27 AM October 13, 2024 9:27 AM

views 36

सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास कायदेशीर व्यवस्थेद्वारे नियंत्रित करण्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील रेशीमबाग मैदानावरील विजयादशमी सोहोळयासाठी मुख्य अतिथि म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के. राधाकृष्णन तसंच सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. सर्व सण आणि उत्सवामध्ये सर्वांचा सहभाग असला पाहिजे असं भागवत यावेळी म्हणाले. बांग्लादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात त्यांनी चिंता व्यक्त केली आणि हिंदूंना एकजूट होण्याचं आवाहन केलं. आपल्या देशाची परंपरा आणि आपली संस्कृतीचा दाखला देऊन कोलकातासारख्या घटना परत घडू नयेत यासाठी आपण सर्वानी सावध राहायला हव...