October 13, 2024 12:29 PM

views 21

दसरा म्हणजेच विजयादशमीचा सण तसंच 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन राज्यभरात उत्साहात साजरा

देशभरात काल दसरा म्हणजेच विजयादशमीचा सण पारंपरिक हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किला मैदानावर दसरा सोहोळ्यात भाग घेतला. वाईटावर चांगल्याचा विजय याचं प्रतीक म्हणून रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचं यावेळी दहन करण्यात आलं. श्री धार्मिक लीला समितीनं आयोजित केलेल्या या दसरा कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दार्जिलिंग मध्ये लष्कराच्या जवानांबरोबर शस्त्रपूजा करून विजयादशमी साजरी केल...