January 4, 2025 11:42 AM January 4, 2025 11:42 AM

views 4

कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरणाची आवश्यकता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याकडून व्यक्त

कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. त्या काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. या संदर्भात कार्यालयातल्या प्रत्येक सहकाऱ्याची जबाबदारी महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान, महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त लातूर इथं दोन दिवसीय पोलीस प्रदर्शनाचं रहाटकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनात पोलिस दलातल्या विविध विभागांची माहिती आणि शस्त्र पाहता य...

October 19, 2024 7:53 PM October 19, 2024 7:53 PM

views 21

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती

केंद्र सरकारनं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात अधिसूचना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं काल जारी केला. या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या त्या पहिल्याच मराठी व्यक्ती आहेत. यापूर्वी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. सध्या त्या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आहेत.