December 23, 2024 7:59 PM December 23, 2024 7:59 PM
3
विजय हजारे कंरडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघ विजयी
विजय हजारे कंरडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा सुरू असून आज मुंबई विरुद्ध हैदराबाद संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने ३ गडी राखून विजय मिळवला. गुजरातमध्ये अहमदाबाद इथे हा सामना झाला. मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हैदराबाद संघाने सर्वबाद १६९ धावा केल्या आहेत. मुंबईकडून अथर्व अंकोलेकर याने चार तर आयुष म्हात्रे याने तीन गडी बाद केले. मुंबई संघाच्या फलंदाजीची सुरुवात देखील फारशी चांगली झाली नाही. सलामीला उतरलेले अंगक्रिश रघुवंशी आणि आयुष म्हात्रे अनुक्रमे १९ आ...