October 26, 2025 7:32 PM October 26, 2025 7:32 PM
96
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमधे जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर
विज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आज जाहीर झाले. प्राध्यापक जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार मिळाला आहे. यंदा विज्ञान श्री पुरस्कारासाठी ८ शास्त्रज्ञांची निवड झाली आहे.विज्ञान युवा श्रेणी अंतर्गत, विविध विषयांमध्ये १४ युवा शास्त्रज्ञांची निवड झाली आहे, तर कृषी विज्ञानामधल्या योगदानासाठीचा विज्ञान टीम पुरस्कार, ‘टीम अरोमा मिशन सीएसआयआर’ ला दिला जाईल. नागपूरच्या नीरी, अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संच...