October 24, 2024 2:37 PM October 24, 2024 2:37 PM

views 25

व्हिएन्ना ओपन : उपांत्य फेरीत रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन जोडीचा सामना नील स्कुपस्की आणि मिशेल व्हिनस जोडीशी होणार

व्हिएन्ना ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडन या जोडीचा सामना ब्रिटनचा नील स्कुपस्की आणि न्यूझीलंडच्या मिशेल व्हिनस या जोडीशी आज होणार आहे. सायंकाळी चार वाजून ५० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.    याआधी झालेल्या सामन्यात रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन या जोडीने रॉबीन हास आणि अलेक्झांडर झ्वेरव यांचा २-६, ७-५, १०-५ असा पराभव केला होता.