July 1, 2024 9:00 AM July 1, 2024 9:00 AM

views 6

विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची आज मतमोजणी

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाची मतमोजणी नाशिक शहरात केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी काल याठिकाणी पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.

June 28, 2024 1:39 PM June 28, 2024 1:39 PM

views 13

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मदत देण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन

अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मदत देऊ, असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन आज दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू झालं. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांंनी विचारलेल्या प्रश्नला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळे राज्यातल्या दोन लाख ९१ हजार हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार हे जाहीर करावं, अशी मागणी विरोधी पक्षने...