December 9, 2024 1:39 PM December 9, 2024 1:39 PM

views 8

झारखंड विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू

झारखंड विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष स्टीफन मरांडी यांनी सदस्यांना शपथ द्यायला सुरुवात केली आहे. शपथग्रहण संपल्यावर उद्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल,त्यानंतर हेमंत सोरेन सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतलं जाईल, बुधवारी राज्यपालांच अभिभाषण होईल आणि त्यानंतर राज्याचा पुरवणी अर्थसंकल्प सादर केला जाईल. 

December 8, 2024 7:02 PM December 8, 2024 7:02 PM

views 9

विरोधकांचा शपथविधीवरचा बहिष्कार मागे, आतापर्यंत २८० सदस्यांचा शपथविधी

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी १०६ नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. काल १७३ नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली होती. महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या वापराला निषेध म्हणून काल शपथ घ्यायला नकार दिला होता. आज अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात बहिष्कार मागे घेऊन सदस्यत्वाची शपथ घेण्याचा निर्णय झाला.    शपथविधीनंतर सभागृहाचं काम...