December 19, 2024 8:17 PM

views 18

राज्यातल्या नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यातल्या, शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत ६६७ मेगावॅट वीज कार्यान्वित झाली. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांकडून विजेचे बिल घेणार नाही, असं ते म्हण...

December 19, 2024 7:47 PM

views 14

भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार होत असून न्याय मिळत नाही-नाना पटोले

भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवर सातत्यानं अत्याचार होत असून त्यांना न्याय मिळत नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विधानसभेत परभणी आणि बीड जिल्ह्यातल्या घटनांवरच्या चर्चेत ते बोलत होते. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करुन निरपराध लोकांवर लाठीचार्ज केला, त्यांना लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? सोमनाथ सुर्यवंशी हा पोलीस लाठीचार्जचा व्हीडिओ शूट करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आणि पोलीस कोठडीत बेदम मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला. पण सरकारनं अद्याप एकाही पो...