November 17, 2024 3:09 PM November 17, 2024 3:09 PM
8
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात
राज्यात विधानसभा निवडणुका अखेरच्या टप्प्यात आल्याने उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो केला. त्यानंतर ते आज दुपारी चांदवड आणि संध्याकाळी कोल्हापुरात इचलकरंजी इथे जाहीर सभा घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे आज नागपुरात उमरेड इथे जाहीर सभा घेत आहेत. महाविकास आघाडीची प्रचाराची समारोपाची जाहीर सभा आज मुंबई इथे होणार आहे. या सभेसाठ...