December 12, 2025 3:29 PM December 12, 2025 3:29 PM
6
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील अहवाल दोन महिन्यात सादर करण्याचे निर्देश
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज ईटीएस मोजणी अहवाल दोन महिन्यात सादर करण्याचे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज दिले. या प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून सरकारचा ६०० कोटींचा महसूल बुडाल्याची तक्रार अमोल कोमावर यांनी केली होती. या प्रकरणी विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात आज बैठक झाली, यावेळी तहसीलदार, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख, रेल विकास निगम यांनी एकत्रित समिती तयार करून ईटीएस मोजणी अहवाल सादर करावा असे निर्देश उपाध्यक्षांनी दिले.