July 2, 2025 3:14 PM

views 13

शेतकरी आत्महत्या संदर्भातल्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव नाकारल्यामुळे विधानसभेत विरोधकांचा सभात्याग

शेतकरी आत्महत्या आणि बैलाच्या जागी स्वतः जोताला जोडण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न याविषयावर विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला. या गंभीर स्थितीवर आताच चर्चा करण्याची मागणी विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी केली, ती अध्यक्षांनी नाकारली. सरकार ही चर्चेला तयार आहे, आम्हालाही शेतकऱ्यांची काळजी आहे असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर दिलं. मात्र याचा निषेध करत विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.