July 7, 2025 8:23 PM July 7, 2025 8:23 PM

views 8

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरुद्ध हक्कभंग प्रस्ताव विधानपरिषदेत मंजूर

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मंजूर केला. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे विधान परिषदेतले गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत कुणाल कामरा यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. सभापती राम शिंदे यांनी या प्रस्तावाला आज मंजुरी दिली असून हा प्रस्ताव आता विधान परिषदेच्या हक्कभंग समितीकडे पुढच्या चौकशीसाठी पाठवण्यात आला आहे.

July 1, 2025 3:38 PM July 1, 2025 3:38 PM

views 11

     विधान परिषद : वाळू उपसा प्रकरणी चर्चा

विधान परिषदेत आज अवैध वाळू उपसा प्रकरण आणि संबंधित प्रकरणी दोषींवर कारवाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. स्थानिक घरकुलांना वाळू उपलब्ध होत नसल्यानं वाळू तस्करी होत असल्याचा मुद्दा दादाराव केचे यांनी  उपस्थित केला.   मात्र राज्य सरकारच्या वाळू धोरणाअंतर्गत  स्थानिक तहसीलदारावर आणि तलाठी यांना घरकुलांना वाळू उपलब्ध करण्याची जवाबदारी निश्चित केल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. संबंधित वाळू भ्रष्टाचार प्रकरणी माहिती घेऊन, पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करण्याचं  बावनकुळे य...

March 18, 2025 3:16 PM March 18, 2025 3:16 PM

views 17

विधानपरिषदेत मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत चर्चा

मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संस्था मराठवाड्याला पाणी मिळू नये म्हणून न्यायालयात गेली होती, त्यामुळे त्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा आपल्याला नाही असा आरोप दानवे यांनी केला. रिवर बेसिस स्टिम्युलेशन पद्धतीचा अवलंब जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी करण्याची मागणी यावेळी दानवे यांनी केली. यावर बैठक घेऊन हा निर्णय घेऊ असं आश्वासन मंत्री विखे पाटील ...

July 1, 2024 1:45 PM July 1, 2024 1:45 PM

views 11

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ४ जागांसाठीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या तीन मतदार संघांची मतमोजणी नवीमुंबईत नेरुळ इथं होत असून मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा इथं मतमोजणी सुरू असताना एका मतदान केंद्रावर तीन मतपत्रिका जास्त निघाल्यानं गोंधळ उडाला. त्यामुळे संबंधित केंद्रावरची मतमोजणी स्थगित झाली आहे.

June 25, 2024 3:08 PM June 25, 2024 3:08 PM

views 24

विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात

विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी २ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येतील ३ जुलै रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ५ जुलै पर्यंत आहे.   १२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात मतदान होईल. मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला दुर्राणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्यानं ही निवडणूक होत आहे.