December 9, 2024 3:44 PM December 9, 2024 3:44 PM

views 12

राज्य विधानसभेत महायुती सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाला. विधानसभा सदस्य उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमडळावर विश्वास दर्शवणारा ठराव सभागृहात मांडला होता, तो सभागृहाने आवाजी मतदानानं मंजूर केला.   त्यानंतर विधानसभेचं कामकाज स्थगित झालं असून आता सायंकाळी राज्यपालांच्या अभिभाषणाने कामकाज पुन्हा सुरू होईल. दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी आता व...

July 28, 2024 2:44 PM July 28, 2024 2:44 PM

views 12

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी आज विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झाला. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. भाजपाच्या पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, शिवसेनेच्या भावना गवळी, कृपाल तुमाने, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर या सदस्यांनी शपथ घेतली. विधानपरिषदेच्या अकरा...

July 6, 2024 9:13 AM July 6, 2024 9:13 AM

views 7

स्पर्धा परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक सादर

स्पर्धा परीक्षेत गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक महाराष्ट्र विधानसभेत काल मांडण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि शिक्षक पात्रता चाचणी यासह शासनाच्या विविध विभाग आणि प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना या कायद्यातील तरतुदी लागू असतील. यात अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना 3 ते 5 वर्ष शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड करण्याची तरतूद आहे. परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्था, सेवा पुरवणा...

July 5, 2024 7:31 PM July 5, 2024 7:31 PM

views 13

विश्वचषक विजेत्या भारतीय संघातल्या मुंबईकर क्रिकेटपटूंचा विधानभवनात सत्कार

टी २० विश्वचषक विजेत्या भारतीय संघातल्या मुंबईकर क्रिकेटपटूंचा आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाला. विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला राज्य सरकारनं ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली.     आजच्या सत्कारमूर्तींमध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसंच सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या खेळाडूंचा समावेश होता. गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांनी केल...

July 2, 2024 1:34 PM July 2, 2024 1:34 PM

views 2

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान भवनात

लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधान भवनात उमटले. भाजप गटनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार यांच्यासह इतरांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. काल विधानपरिषदेत झालेल्या गदारोळावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली. प्रत्युत्तरादाखल विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही राज्यघटनेच्या प्रस्ताविकेच्या प्रती हातात घेऊन घोषणाबाजी केली.