December 9, 2025 1:33 PM December 9, 2025 1:33 PM
25
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. कर्जमाफीचं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत, कापसावरील आयात कर शून्य करून परदेशातला कापूस आयात केला जात आहे, अशी टीका विरोधकांनी केली. राज्यात दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करत असून सरकारचं धोरण सरकारविरोधी आहे, अशी टीका करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. ] फलटण येथील महिला डॉक्टरच्या ...