June 23, 2025 3:23 PM June 23, 2025 3:23 PM

views 11

विदर्भात नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राला सुरुवात

राज्य शिक्षण मंडळाच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राला विदर्भात आजपासून सुरुवात झाली.    वाशिम जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.    यवतमाळ जिल्ह्यातही प्रभात फेरी काढून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. सुकळी इथं फुगे आणि हारांनी सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक निघाली. विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ पाठ्यपुस्तके देऊन करण्यात आलं. &n...

March 15, 2025 10:14 AM March 15, 2025 10:14 AM

views 6

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात काल पारा 39 ते 40 अंशांच्या आसपास होता; सोलापुरातही काल तापमान 41 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.   आज विदर्भात काळी ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

February 26, 2025 3:21 PM February 26, 2025 3:21 PM

views 20

Ranji Trophy Final : विदर्भ आणि केरळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी विदर्भ आणि केरळ यांच्यातल्या अंतिम सामन्याला आज नागपूरमधे सुरुवात झाली. केरळनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या सत्राच्या खेळात केरळनं अवघ्या २४ धावांमध्येच विदर्भाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत धाडले. मात्र त्यानंतर चौथ्या गड्यासाठी दानिश मालेवार यानं झुंझार शतकी खेळीसह करूण नायर याच्यासोबत दीड शतकी भागिदारी करत विदर्भाचा डाव सावरला. केरळच्या निधीश यानं विदर्भाचे दोन गडी बाद केले.   शेवटचं वृत्त हाती आलं तेव्ह...

September 27, 2024 3:04 PM September 27, 2024 3:04 PM

views 21

विदर्भात औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद

विदर्भातल्या औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज नागपुरात ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’  कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना ही माहिती दिली. मागच्या तीन महिन्यात एकट्या महाराष्ट्रात ७५ हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली असून, गुंतवणूकीचा हा प्रवाह असाच सुरू राहणार अ‍सल्याचं ते म्हणाले.   पुढच्या वर्षापर्यंत गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसून, उद्योगनगर...

July 10, 2024 1:49 PM July 10, 2024 1:49 PM

views 14

मराठवाडा आणि विदर्भात पहाटे भूकंपाचे धक्के

महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता साडेचार रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा गावात होता. भूकंपामुळे कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी झालेली नाही. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी आणि हिंगोली तर विदर्भातल्या वाशिम इथंही भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं ...