March 2, 2025 7:46 PM March 2, 2025 7:46 PM
6
विकसित भारत हे आता स्वप्न राहिलं नसून ते आता आपलं उद्दिष्ट-उपराष्ट्रपती
विकसित भारत हे आता स्वप्न राहिलं नसून ते आता आपलं उद्दिष्ट झालं आहे आणि ते साध्य करण्यात देशाची युवाशक्ती अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी ग्वाही उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. तिरुवनंतपुरम इथं पी. परमेश्वरन स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. सध्या भारत देशातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच चौथ्या स्थानी झेप घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमानंतर ते हैदराबादला रवाना झाले.