August 19, 2025 5:05 PM August 19, 2025 5:05 PM

views 7

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडी आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी

उपराष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडी आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इंडी आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी एकमताने रेड्डी यांच्या नावाला संमती दिल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज नवी दिल्लीत इंडी आघाडीच्या घटकपक्षांच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत दिली. ही निवडणूक विचारधारेची असून राज्यघटना जेव्हा धोक्यात येते, तेव्हा सगळे विरोधी पक्ष एकजुटीने त्याविरोधात उभे राहतात, असंही खर्गे म्हणाले. बी. सुदर्शन रेड्डी ...

August 1, 2025 8:59 PM August 1, 2025 8:59 PM

views 18

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला मतदान

नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. येत्या ७ ऑगस्टला निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होईल. २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत राहील तर ९ सप्टेंबरला मतदान होणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे.   जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे. आयोगानं या निवडणुकीसाठी मतदार संघातल्या सदस्यांची यादी अद्ययावत केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपराष्ट्रपती निवडतात.

August 1, 2025 3:03 PM August 1, 2025 3:03 PM

views 9

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. येत्या ७ ऑगस्टला निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होईल. २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत राहील तर ९ सप्टेंबरला मतदान होणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे.   जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे. आयोगाने या निवडणुकीसाठी मतदार संघातल्या सदस्यांची यादी अद्ययावत केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपराष्ट्रपती निवडतात.