July 22, 2025 1:13 PM July 22, 2025 1:13 PM

views 7

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारल्याची माहिती राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी सभागृहात दिली. जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासह देशाची सेवा करण्याच्या अनेक संधी मिळाल्या असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.    धनखड यांनी काल प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला. आरोग्याशी निगडीत कारणं आणि वैद्यकीय उपचारांसाठी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं ...

July 22, 2025 8:40 AM July 22, 2025 8:40 AM

views 2

प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

उपराष्ट्रपपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरोग्याशी निगडीत कारणं आणि वैद्यकीय उपचारांसाठी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. आपल्या कार्यकाळात राष्ट्रपतींनी केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. त्याचबरोबर धनखड यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या प्रति कृतज्ञता व्यनक्तत केली आहे.   प्रधानमंत्र्यांचं अमूल्य सहकार्य आणि संसद सदस्य...

May 28, 2025 7:01 PM May 28, 2025 7:01 PM

views 2

लोकसंख्याशास्त्रातलं संशोधन फक्त अभ्यासक्रमापुरतं मर्यादित राहू नये-उपराष्ट्रपती

लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता हे नव्या भारताचे तीन आधारस्तंभ आहेत असून लोकसंख्येचा अभ्यास करणारे विद्यार्थी या तिन्ही स्तंभांच्या मध्यभागी राहून आकडेवारी आणि धोरणनिर्मिती यातला दुवा म्हणून महत्त्वाचं काम करतात, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. मुंबईत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या ६५ व्या आणि ६६ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. देशाला शाश्वत विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यात लोकसंख्याशास्त्र अमूल्य योगदान देतं, यातल्या आकडेवारीच्या आधारे शाश्वत विकास, आर्थिक प्र...

May 20, 2025 1:08 PM May 20, 2025 1:08 PM

views 9

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून गोवा दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर जात आहेत. या भेटी दरम्यान, उद्या ते मोरमुगाव बंदरावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पांचं लोकार्पण करतील. तसंच बंदरावरील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. गुरुवारी, उपराष्ट्रपती कृषी संशोधन केंद्राला भेट देतील. तसंच राजभवन इथं उभारण्यात आलेल्या आयुर्वेदतज्ज्ञ चरक आणि सुश्रुत यांच्या पुतळ्यांचं अनावरण करणार आहेत.

April 17, 2025 8:29 PM April 17, 2025 8:29 PM

views 9

राज्यसभेतल्या आंतरवासितांच्या ६ व्या तुकडीला उपराष्ट्रपतींचं संबोधन

विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतींना कालमर्यादा निश्चित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडच्या निकालावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भारताच्या राष्ट्रपतींना न्यायालय निर्देश देऊ शकत नाही. न्यायालय फक्त घटनेचा अर्थ लावू शकतं, आणि त्यासाठी ५ सदस्यीय घटनापीठ हवं असं ते म्हणाले. न्यायाधीशांनी कायदे ठरवावे, सरकारची कामं पार पडावीत, आणि परम संसद म्हणून काम  करावं अशी लोकशाही भारताला अपेक्षित नव्हती, असं ते म्हणाले. ते आज राज्यसभेतल्या आंतरवासितांच्या सहाव्या त...

March 9, 2025 3:37 PM March 9, 2025 3:37 PM

views 10

उपराष्ट्रपती जगदीप धनखड एम्समध्ये दाखल

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे काल रात्री उशिरा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्स मध्ये दाखल करण्यात आलं आहे. रात्री उशिरा त्यांच्या छातीत दुखून त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. कार्डिओलॉजि विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली ते असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन धनखड यांची विचारपूस करून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.   

March 6, 2025 8:32 PM March 6, 2025 8:32 PM

views 7

देशातल्या नागरिकांच्या स्थलांतरावर आणि धर्मांतरावर उपराष्ट्रपतींची टीका

देशातल्या नागरिकांच्या स्थलांतरावर आणि धर्मांतरावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी टीका केली आहे. या मुद्द्यांकडे लक्ष दिलं नाही तर आपलं अस्तित्व धोक्यात सापडेल असा इशारा त्यांनी दिली.  मुंबईत मुरली देवरा स्मृती संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.    लोकशाहीमध्ये संवाद आवश्यक असल्याची गरज त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. देशातल्या अनेक संस्थांचं खच्चीकरण होत आहे. त्याकडे राजकारण्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असं ते म्हणाले. संसदेत कुठल्याही विचारसरणीच्या पलीकडे संवाद झाला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

March 1, 2025 7:16 PM March 1, 2025 7:16 PM

views 2

महत्त्वाच्या विद्यापीठांच्या पुनरुज्जीवनाची गरज उपराष्ट्रपतींकडून व्यक्त

भारतात एकेकाळी ज्ञानाची केंद्रं म्हणून कार्यरत असलेल्या नालंदा, तक्षशीला अशा महत्त्वाच्या विद्यापीठांचं पुनरुज्जीवन व्हायला हवं, असं आग्रही प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. मुंबईत के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिक्षण आणि तंत्रज्ञान हे समाजपरिवर्तनासाठी महत्त्वाचे घटक आहेत, असं सांगून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण जीवनाचा कायापालट घडवण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्यपाल सी. पी. राधाकृ...

February 20, 2025 3:18 PM February 20, 2025 3:18 PM

views 7

उपराष्ट्रपती जगदीप धनखड शनिवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड शनिवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या पदवीदान समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. उपराष्ट्रपतींच्या हस्ते एस बी महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवाच उद्घाटन होणार आहे. यावेळी उपराष्ट्रपती एलोरा येथील घृष्णेश्वर मंदिरात पूजा करणार असून वेरुळ गुंफांनाही भेट देणार आहेत.

January 31, 2025 2:46 PM January 31, 2025 2:46 PM

views 2

महिलांच्या योगदानाशिवाय देश समृद्ध होऊ शकत नाही – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

महिलांच्या योगदानाशिवाय देश समृद्ध होऊ शकत नाही, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. देशात प्रथमच लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या महिला अनेक आव्हानांना सामोऱ्या जात असून त्या युद्ध करण्यासाठी सुरक्षा दलात देखील सहभागी होत आहेत, असं त्यांनी सांगितलं. कामाच्या ठिकाणी आणि इतर जागी महिलांबाबत होत असलेल्या भेदभाव कमी करण्यासाठी महिला ...