September 10, 2025 9:17 AM September 10, 2025 9:17 AM
133
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत विजयी
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीमध्ये विजयी झाले आहेत. या पदासाठी काल झालेल्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी आपले प्रतिस्पर्धी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत ७८१ पैकी ७६४ सदस्यांनी मतदान केलं. त्यामध्ये राधाकृष्णन यांना ४५२ तर बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतं मिळाली. नव्या संसद भवनात झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत मतदान न करायचा निर्णय बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र सम...