January 14, 2025 5:32 PM January 14, 2025 5:32 PM
7
सशस्त्र सेनांमधून निवृत्त झालेले कर्मचारी हे देशाचा अभिमान-संजय सेठ
नवव्या सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिनानिमित्त केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आज मुंबईतल्या नौदलाच्या गोदीत गौरव स्तंभ इथं देशासाठी बलिदान दिलेल्यांना आदरांजली वाहिली. सशस्त्र सेनांमधून निवृत्त झालेले कर्मचारी हे देशाचा अभिमान आहेत, असं सांगून त्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही सेठ यांनी दिली. अशा कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी गेल्या १० वर्षांमध्ये १ लाख २४ हजार कोटी रुपये खर्च केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर भारतीय नौदल खलाशी संस...