October 15, 2025 8:03 PM October 15, 2025 8:03 PM

views 27

ज्येष्ठ तेलगु अभिनेत्री-गायिका रावु बालसरस्वती देवी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेलुगु चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या पार्श्वगायिका रावु बालसरस्वती देवी यांचं हैदराबाद इथं निधन झालं त्या ९७ वर्षांच्या होत्या. बालकलाकार म्हणून त्यांनी काम सुरु केलं. १९४३ मधे भाग्यलक्ष्मी या चित्रपटात अभिनेत्री कमला कोटणीस यांच्यासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. अभिनेत्री आणि गायिका म्हणून अनेक चित्रपटांमधे त्यांनी योगदान दिलं. आकाशवाणीच्या त्या पहिल्या सुगम संगीत गायिका होत्या.