January 4, 2026 2:40 PM

views 79

उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉडरीगेझ यांची व्हेनेझुएलाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती

व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांना देशाच्या हंगामी अध्यक्ष  म्हणून पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर  हा निर्णय घेण्यात आला. प्रशासकीय सातत्य आणि देशाची व्यापक सुरक्षा लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.      दरम्यान, व्हेनेझुएलामधल्या सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत  ‘स्पेसएक्सच्या मालकीची स्टारलिंक सेवा  व्हेनेझुएलामध्ये येत्या  ३ फेब्रुवारीपर्यंत मोफत ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरवणार असल्याचं ...

November 18, 2025 7:17 PM

views 22

व्हेनेझुएलामध्ये अमेरिकी लष्कर तैनात करायचा पर्याय अद्यापही खुला-डोनाल्ड ट्रम्प

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलास माडूरो यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्याचवेळी, व्हेनेझुएलामध्ये अमेरिकी लष्कर तैनात करायचा पर्याय अद्यापही खुला असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेनं व्हेनेझुएला आणि मेक्सिकोमधून काम करणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांवर कारवाईसाठी कॅरिबियनमध्ये लष्कराचं प्रमाण वाढवल्यानंतर दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये व्हेनेझुएलाचे अनेक खलाशी मृत्यूमुखी प...

July 29, 2024 8:38 PM

views 18

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस मादुरो विजयी

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस मादुरो विजयी झाल्याची घोषणा राष्ट्रीय निवडणूक परिषदेने केली आहे. मादुरो सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले आहेत. ८० टक्के मतपत्रिकांची मोजणी झाली असून मादुरो यांना ५१ टक्के मतदान झाल्याचं निवडणूक परिषदेचे एल्विस अमोरोसो यांनी सांगितलं. एकूण मतदारांपैकी २१ दशलक्ष मतदारांनी निकोलस मादुरो यांना आपली पसंती दर्शवली आहे. दरम्यान, हा निकाल फसवा असून याला कायदेशीर आव्हान देणार असल्याचं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे.