December 18, 2025 3:05 PM December 18, 2025 3:05 PM

views 73

VB GRAMG Bill: व्ही बी जी-राम जी विधेयक! नेमकं काय?

विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी अभियान अर्थात व्ही बी जी-राम जी विधेयक २०२५ आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झालं. हे विधेयक २० वर्षांपासून चालत आलेल्या, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५ अर्थात 'मनरेगा'ची जागा घेईल. मनरेगात १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली आहे. या विधेयकात सव्वाशे दिवसांच्या कामाची हमी प्रस्तावित आहे.   पेरणी किंवा कापणीच्या हंगामात एकंदर ६० दिवसांचा कालावधी अधिसूचित करायचा अधिकार राज्यांना दिला आहे. यादरम्यान काम थांबवलं जाईल, जेणेकरून शेतीतल्या क...

December 18, 2025 5:49 PM December 18, 2025 5:49 PM

views 1

व्हीबी – जीरामजी विधेयक मागे घेण्यासाठी विरोधकांचं निदर्शन

व्हीबी- जी राम जी हे विधेयक मागे घ्यावं, या मागणीसाठी आज विरोधी पक्ष सदस्यांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. मनरेगाचे फलक हातात घेऊन विरोधकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून ते मकरद्वारापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चाही काढला. केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केला असून भारताच्या ग्रामीण भागात सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या योजनेवरही गदा आणली आहे, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले.