October 28, 2024 3:16 PM October 28, 2024 3:16 PM
7
दीपावलीच्या मंगलपर्वाला वसुबारसपासून प्रारंभ
देशभरात दीपावलीच्या मंगलपर्वाला आज, गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसेपासून प्रारंभ झाला. आज, गायवासराची पूजा करून दिवाळीची सुरुवात होईल. येत्या रविवारपर्यंत चालणाऱ्या या प्रकाशोत्सवानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे. मनोवेधक रोषणाईनं बाजारपेठा सजल्या आहेत. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या या बरोबरच कपडे, दागिने खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे.