August 27, 2024 10:23 AM August 27, 2024 10:23 AM

views 12

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला न्यूयॉर्कमध्ये सुरुवात

यावर्षीच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला काल न्यूयॉर्कमध्ये सुरुवात झाली. आज सकाळी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत सुमित नागलचा सामना डच खेळाडू टॅलन ग्रीक्सपूरशी होईल. एका वर्षातील चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या एकेरी स्पर्धेत भाग घेणारा नागल हा 2019 नंतरचा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. दोन वेळचा ग्रँडस्लॅम विजेता खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांना पुरुष दुहेरीत स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या होरासिओ झेबॉलोस यांच्या नंतरचं दुसरं मानांकन मिळालं...