January 1, 2026 7:49 PM

views 15

काँग्रेसचं उद्दिष्ट मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करून पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देण्याचं आहे- वर्षा गायकवाड

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचं उद्दिष्ट मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करून पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देण्याचं आहे, असं मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड म्हणाल्या. त्या आज मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.   सत्ताधारी महायुतीने गेली अनेक वर्षं मुंबई महापालिकेच्या प्रशासनात राहून मुंबईकरांच्या हक्कांचं दमन केलं असून त्यांच्या पैशाची लूट केल्याचा आरोपही वर्षा गायकवाड यांनी केला. महायुतीने २०२२पासून प्रशासकाची नेमणूक करून महापालिकेच्या मुदत ठेवीतले १२ हजार कोटी रुपये लाटल्याचा आरोपही...

November 29, 2025 6:06 PM

views 15

मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी – वर्षा गायकवाड

मुंबईतल्या वायू प्रदूषणाच्या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली  आहे. त्या मुंबईत हवेच्या गुणवत्ता विषयावर काँग्रेसकडून आयोजित बैठकीत आज बोलत होत्या. दूषित हवेमुळे दरवर्षी मुंबईतले ५ हजार शंभर लोक आपले प्राण गमावतात असं गायकवाड यांनी हावर्ड विद्यापीठाच्या अभ्यासाचा हवाला देऊन सांगितलं.  बेसुमार बांधकाम, वृक्षतोड, पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन यामुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. मात्र महायुती सरकार केवळ कंत्राटदारांच्या फायद्याची ध...