June 27, 2025 9:55 AM June 27, 2025 9:55 AM
14
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. “माऊली माऊली” च्या गजरात पालखीचं जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यापूर्वी माऊलींच्या पादुकांना निरा नदी पात्रात पारंपरिक पद्धतीने स्नान घालण्यात आलं. पालखी आज लोणंदचा मुक्लाम आटोपून पुढे मार्गस्थ होणार आहे. संत श्री गजानन महाराजांची पालखी काल धाराशिव शहरात पोहोचली. पालखीच्या स्वागतासाठी शहरात भाविकांनी रस्त्यावर फुलांच्या पायघड्...