November 8, 2025 9:57 AM November 8, 2025 9:57 AM

views 28

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणशी दौऱ्यात वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणशी दौऱ्यात आज चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. मोदी यांचं काल संध्याकाळी त्यांच्या संसदीय मतदारसंघात भव्य स्वागत करण्यात आलं.   नवीन वंदे भारत गाड्या बनारस-खजुराहो, लखनऊ-सहारनपूर, फोरिझपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बंगळुरू या मार्गांवरून धावणार आहेत. या गाड्यांमुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल तसंच तिथल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

February 15, 2025 10:17 AM February 15, 2025 10:17 AM

views 16

तिसऱ्या काशी तामिळ संगमाला आजपासून वाराणसीत सुरुवात

तामिळनाडू आणि काशी यांच्यादरम्यान सांस्कृतिक आणि बौद्धिक सहसंबंधांना चालना देणारा काशी तामिळ संगम महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीला आजपासून उत्तरप्रदेशच्या वाराणसी इथं प्रारंभ होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माहिती आणि प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्य मंत्री डॉ. एल मुरूगनही यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.   दहा दिवसांच्या या महोत्सवात विद्यार्थी, तज्ज्ञ, विद्वान, तत्वज्ञ, व्यापारी, कारागीर, कलाकार तसंच सर्व स्तरातल्या ...

October 21, 2024 10:54 AM October 21, 2024 10:54 AM

views 14

वाराणसीमध्ये 6 हजार 700 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी या आपल्या संसदीय मतदारसंघात 6 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची काल पायाभरणी आणि उद्घाटन केले. शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा, आरोग्यसेवा आणि पर्यटन यासह इतर क्षेत्रांशी संबंधित या विकास प्रकल्पांमुळं वाराणसीतल्या लोकांचं जीवनमान सुधारेल तसंच तरुणांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.सारनाथमधील बौद्ध धर्माशी संबंधित क्षेत्राच्या पर्यटन विकास कामांचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी क...

October 20, 2024 8:25 PM October 20, 2024 8:25 PM

views 13

जनतेचा पैसा जनतेच्या, देशाच्या विकासावर प्रामाणिकपणे खर्च करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री

जनतेचा पैसा जनतेच्या, देशाच्या विकासावर खर्च व्हावा, तो प्रामाणिकपणे खर्च व्हावा, याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  म्हटलं आहे. ते आज उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी इथं ६ हजार ७०० कोटी रुपयांच्या २३ बहुविध विकास प्रकल्पाचं उदघाटन आणि पायाभरणी करताना बोलत होते. देशातल्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांविषयी त्यांनी यावेळी सांगितलं. पायाभूत सुविधांमुळे नागरिकांचं जीवन सुलभ होण्यासोबतच रोजगारनिर्मिती होते, याकडे ...