December 18, 2024 8:23 PM December 18, 2024 8:23 PM
4
वानुआटू पोर्ट व्हिला इथं झालेल्या भूकंपात आतापर्यंत किमान १४ जणांचा मृत्यू
वानुआटू या दक्षिण प्रशात महासागरातल्या देशाची राजधानी पोर्ट व्हिला इथं काल झालेल्या शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपामुळे दोन इमारती कोसळल्यामुळे त्यात २०० जण जखमी झाले आहेत. बचावकार्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या आपत्ती मदत प्रतिसाद पथकाचे अधिकारी या देशात दाखल झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं रेडक्रॉसनं म्हटलं आहे.