December 30, 2024 3:56 PM December 30, 2024 3:56 PM
3
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट निश्चित
राज्यात खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केलं असून, त्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे. राज्यात २०२४-२५ या वर्षात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं केलं आहे. त्यापैकी सद्यस्थितीत १४ हजार १०९ वनराई बंधारे बांधून तयार झाले आहेत. या बंधाऱ्याद्वारे सुमारे एक लाख हेक्टरवरची रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा, फुलशेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. तसंच भूगर्भातल...