December 9, 2025 8:16 PM December 9, 2025 8:16 PM

views 12

विकसित भारतालाही वंदे मातरमची गरज असेल – गृहमंत्री अमित शहा

स्वातंत्र्य लढ्यावेळीच नव्हे तर आज आणि २०४७मध्ये विकसित भारत झाल्यानंतरही वंदे मातरम या गीताची गरज भासेल, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. ते राज्यसभेत वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष चर्चेला प्रारंभ करताना बोलत होते. दोन्ही सभागृहांमध्ये वंदे मातरम या गीतावरची चर्चा ही भावी पिढ्यांना या गीताचं महत्त्व समजण्यासाठी मदत करे, असं शहा म्हणाले.   Rajyaस्वातंत्र्यलढ्यावेळी काँग्रेसने वंदे मातरम हेच ध्येय आणि घोषणा बनवली, असं राज्यसभेतले वि...

December 9, 2025 9:55 AM December 9, 2025 9:55 AM

views 29

वंदे मातरम हे भारतीयांच्या संकटांशी सामना करण्याच्या ताकदीचं प्रतीक – प्रधानमंत्री

भारत आणि भारतीयांमध्ये प्रत्येक प्रश्न, प्रत्येक संकटाचा सामना करण्याची ताकद आहे, आणि वंदे मातरम् हे गीत त्या ताकदीचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केलं. 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत एक विशेष चर्चा झाली, त्यावेळी मोदी बोलत होते. 'वंदे मातरम्' हे केवळ एक गीत नाही, तर ते भारतीयांच्या मनात वसलेलं समृद्ध भारताचं चित्र आहे, असं मोदी म्हणाले.   यावेळी प्रधानमंत्र्यांनी वंदे मातरमच्या दीडशे वर्षांच्या इतिहासाचा मा...

December 8, 2025 7:08 PM December 8, 2025 7:08 PM

views 51

Lok Sabha : लोकसभेत ‘वंदे मातरम’वर चर्चा

समृद्ध भारताची भावना वंदे मातरम् मुळे फलद्रुप होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्तवला आहे.  लोकसभेत आज वंदे मातरम गीतावरच्या चर्चेला सुरूवात करताना ते बोलत होते. ज्या वंदे मातरम् मंत्राने स्वातंत्र लढ्यासाठी प्रेरणा दिली, तोच मंत्र समृद्धतेचीही प्रेरणा देईल, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. वंदे मातरम् ही फक्त स्मरण करण्याची बाब नव्हे तर संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. आपल्यावर वंदे मातरम् चं ऋण असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ...

December 7, 2025 7:23 PM December 7, 2025 7:23 PM

views 10

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय गीतावर चर्चा होणार

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षं झाल्यानिमित्त उद्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत या गीतावर चर्चा होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या चर्चेला सुरुवात करणार आहेत. दुपारी बारा वाजता चर्चेला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे निवडणूक सुधारणा या विषयावर ९ डिसेंबरला चर्चा होणार असल्याचं सर्वपक्षीय बैठकीत निश्चित झालं आहे.

November 7, 2025 8:55 PM November 7, 2025 8:55 PM

views 139

वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

देशप्रेमाचं प्रतीक असलेल्या वंदे मातरम् गीताच्या ‘शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी’ वर्षांचं उद्घाटन आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने, देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन होणार आहे.   मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात आज सकाळी १० वाजता ‘वंदे मातरम्...

November 7, 2025 2:28 PM November 7, 2025 2:28 PM

views 48

स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाची आज सुरुवात झाली. हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहिलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं ‘वंदे मातरम्‌’ शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं उद्घाटन केलं. ‘वंदे मातरम्‌’ हा एक मंत्र आहे, एक ऊर्जा आहे, एक स्वप्न आणि एक संकल्प आहे, असं प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितलं. हे गीत म्हणजे भारतमातेप्रति भक्ती आणि आदर व्यक्त करणारा भाव आहे, जो आपल्याला इतिहासाशी जो...

November 7, 2025 2:24 PM November 7, 2025 2:24 PM

views 21

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा वंदे मातरम् गीताला अभिवादन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त अभिवादन केलं आहे. स्वातंत्र्यसमराच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात सन्यांशांनी पुकारलेल्या बंडाच्या वेळी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या अमर गीताची रचना केली होती, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. हे गीत आजही सर्व भारतीयांना एका सूत्रात बांधून ठेवण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यानिमित्तानं सर्व नागरिकांनी भारतमातेच्या समृद्धीसाठी काम करण्याचा संकल्प करावा, असं आवाहन त्यांनी के...

October 30, 2025 5:22 PM October 30, 2025 5:22 PM

views 196

‘वंदे मातरम्’ म्हणा, अन् व्हिडिओ पाठवा

देशाच्या 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातल्या सर्व शाळांमध्ये वंदे मातरम् म्हणण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार, वंदेमातरम् गीताची महती, माहिती, अर्थ, इतिहास सांगतानाचा २५ ते ३० सेकंदाचा व्हिडिओ तसंच २-३ छायाचित्रं आपल्या शाळा, महाविद्यालय तसंच गावाच्या नावासकट ठाण्यातल्या राजमाता जिजाबाई ट्रस्टच्या https://drive.google.com/drive/folders/1YCrCpOJXWVZI8V7L7bt8EeJ1H_ULCNCJ?usp=sharing या लिंकवर पाठवा.