November 7, 2025 8:50 PM

views 154

‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण: राज्यभरात सामूहिक गायन आणि स्मरणोत्सवाचे आयोजन

'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात सगळीकडे वंदे मातरम् या गीताचं स्मरण करण्यात आलं. मुंबईमध्ये राजभवनात राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती यांच्या उपस्थितीत तर मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदे मातरम् गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुंबई विद्यापीठातही कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं.  ...