September 16, 2024 1:26 PM September 16, 2024 1:26 PM

views 15

प्रधानमंत्री आज देशभरातल्या पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देशभरातल्या पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यात महाराष्ट्रातल्या पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.   तसंच दुर्ग ते विशाखापट्टणम आणि आग्रा छावणी ते वाराणसी या वंदे भारत रेल्वेगाड्यांनाही प्रधानमंत्री आज हिरवा झेंडा दाखवतील. महाराष्ट्रात पुणे-हुबळी आणि कोल्हापूर - पुणे या दोन्ही गाड्या प्रत्येकी तीन दिवस चालणार आहेत. छत्तीसगडमधील दुर्ग ते विशाखापट्टणम ही गाडी गुरुवार वगळता आ...

September 16, 2024 9:35 AM September 16, 2024 9:35 AM

views 12

विस्तारीत रेल्वे जाळ्यामुळे पूर्व भारतातल्या आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळेल- प्रधानमंत्री

पूर्व भारतातल्या विस्तारित रेल्वे जाळ्यामुळं संपूर्ण प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. झारखंड राज्याची राजधानी रांची इथं ते काल बोलत होते. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून काल साडेसहाशे कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचं भूमीपूजन तसंच लोकार्पण करण्यात आलं. याचवेळी प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ माध्यमातून सहा नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.   प्रधानमंत्री जमशेदपूरमधल्या टाटानगर ...

August 31, 2024 3:39 PM August 31, 2024 3:39 PM

views 20

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

वंदे भारत रेल्वेगाड्यांचा वाढता विस्तार, आधुनिकता आणि वेग हे विकसित भारताच्या दिशेनं पडलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मीरत-लखनौ, मदुराई-बेंगळुरू आणि चेन्नई-नागरकोईल या तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. या गाड्यांमुळे देशातली महत्त्वाची शहरं आणि ऐतिहासिक शहरं जोडली जातील, मंदिरांचं शहर असा लौकिक असलेलं मदुराई माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रणी असलेल्या बेंगळुरूशी जोडलं जाईल, असं प्रधानमंत्र्यांनी यावे...