November 8, 2025 9:57 AM November 8, 2025 9:57 AM

views 28

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणशी दौऱ्यात वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणशी दौऱ्यात आज चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. मोदी यांचं काल संध्याकाळी त्यांच्या संसदीय मतदारसंघात भव्य स्वागत करण्यात आलं.   नवीन वंदे भारत गाड्या बनारस-खजुराहो, लखनऊ-सहारनपूर, फोरिझपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बंगळुरू या मार्गांवरून धावणार आहेत. या गाड्यांमुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल तसंच तिथल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

September 17, 2024 10:01 AM September 17, 2024 10:01 AM

views 8

पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे, नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून लोकार्पण

राज्यातल्या तीन वंदे भारत एक्सप्रेसचा प्रारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे आणि नागपूर सिकंदराबाद मार्गांवर या गाड्या धावतील. पुणे हुबळी वंदे भारत रेल्वेला नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पुण्यातल्या रेल्वे स्थानकावरुन रवाना करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या गाडीमुळे राज्यातल्या प्रवाशांचा प्रवास सुख...