November 8, 2025 1:31 PM November 8, 2025 1:31 PM

views 21

वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत सारख्या गाड्या भारतीय रेल्वेच्या भवितव्याचा पाया घालत आहेत, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं चार वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यात वाराणसी-खजुराहो, लखनौ-सहारानपूर, फिरोजपूर-दिल्ली, आणि एर्नाकुलम-बंगळुरू या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे वंदे भारत गाड्यांची संख्या आता १६० झाली आहे.   विकसनशील देशांमधल्या पायाभूत सुविधांचा विकास हा त्या देशाच्या आर्थिक विकासात भर टाकत असतो. रेल्वे आणि रस्ते बनतात तेव्हा विकासाला चालना मिळते, आज भारत देखील विकासाच्या मार्गावर वेगानं जात आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केल...

August 11, 2025 9:55 AM August 11, 2025 9:55 AM

views 7

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांचं लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सुमारे 7 हजार 160 कोटी रुपयांच्या बेंगळुरू मेट्रोच्या यलो लाईनचं उद्घाटन आणि 15 हजार 610 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची पायाभरणी केली. आरव्ही रोड, रागीगुड्डा ते बोम्मासंद्रा यांना जोडणाऱ्या या मेट्रो लाईन सह बेंगळुरूचं मेट्रो नेटवर्क 96 किलोमीटर हून जास्त झालं आहे. प्रमुख निवासी, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रांदरम्यान सुलभ वाहतुकीसाठी बेंगळुरू मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यात 44 किमीचा उन्नत मार्ग आणि 31 स्थानकं जोडली जाणार आहेत. &n...

August 10, 2025 3:29 PM August 10, 2025 3:29 PM

views 5

वंदे भारतमुळे वेळेची बचत होऊन विदर्भातल्या लोकांना पुण्याशी जोडलं जाईल – मुख्यमंत्री

देशात नागपूर-पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत रेल्वे सुरु झाली असून त्यामुळे वेळेची मोठी बचत होऊन विदर्भातल्या लोकांना पुण्याशी जोडलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर अजनी पुणे या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाप्रसंगी नागपूर रेल्वे स्थानकावर ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ज्या प्रवासाला आधी १६ ते १७ तास लागत होते ते अंतर आता  केवळ बारा तासात कापणं शक्य होणार असून त्यासाठी त्यांनी  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्वि...

June 5, 2025 9:38 AM June 5, 2025 9:38 AM

views 9

प्रधानमंत्री उद्या कटरा इथं रेल्वे सेवेचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कटरा इथं बहुप्रतीक्षित रेल्वे सेवांचं उद्घाटन करणार आहेत. वैष्णो देवी बेस कॅंपपासून बारामुल्लापर्यंत वंदे भारत रेल्वे सुरू होणार आहे. त्यामुळे जम्मू ते श्रीनगर दरम्यान थेट रेल्वेसेवा पहिल्यांदाच सुरू होत आहे. पंतप्रधान अंजी खेड या जगातल्या सर्वांत उंचावरच्या रेल्वे पुलाचंही उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमसाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे

January 9, 2025 1:37 PM January 9, 2025 1:37 PM

views 15

कटरा ते श्रीनगर दरम्यान जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार

  कटरा ते श्रीनगर या दरम्यानचा प्रवास ३ तास १० मिनिटात  करणारी जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे लवकरच सुरु होईल, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.   या रेल्वेला आठ डबे असतील बनिहाल ते कटरा या १११ किलोमीटरच्या टप्प्याची सुरक्षाविषयक अंतिम तपासणी सुरू झाल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या वर्षी रेल्वे सेवा प्रत्यक्ष सुरू होईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. जम्मू स्थानकाचाही पुनर्विकास सुरू असून तिथं आठ फलाट आणि आधुनिक सेवासुविधा सुरू होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. ...

June 16, 2024 2:46 PM June 16, 2024 2:46 PM

views 16

वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील दोन महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी घेण्यात येणार

वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील दोन महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी सुरू होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत दिली. सध्या वंदेभारत मध्ये केवळ बसण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. वंदेभारतमध्ये शयनयानाची मागणी प्रवाशांकडून होत असल्याचं वैष्णव म्हणाले. गेल्या दहा वर्षात ३५ हजार किलोमीटर रेल्वेमार्गाचं जाळं निर्माण करण्यात आलं असून कमी उत्पन्न गटाच्या प्रवाशांनाही आरामदायी प्रवास-सोयी उपलब्ध करुन देण्याकडे आपण लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलं. अमृत भारत रेल्वेच्या उत्पाद...