October 9, 2024 3:35 PM October 9, 2024 3:35 PM

views 18

विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीची १० उमेदवारांची यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या दहा उमेदवारांची यादी आज जाहीर केली. यात मलकापूर, बाळापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, माण, शिरोळ आणि सांगली या जागांसाठी पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे.

September 9, 2024 7:01 PM September 9, 2024 7:01 PM

views 17

राज्यातल्या आदिवासी संघटनांना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या सर्व आदिवासी संघटनाना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. आज मुंबईत वार्ताहर परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.  आरक्षित जागाच आदिवासींनी लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे, तो या विधानसभेच्या निमित्तानं तोडायचा मानस आम्ही केला असून, काही सर्वसाधारण जागावर आदिवासी उमेदवार निवडणूक लढवतील, असं त्यांनी सांगितलं.   राज्यातले आदिवासी आता एकत्र आले असून, यापुढं त्यांची एकत्रित वाटचाल होणार आहे. या दृ...

September 25, 2024 6:03 PM September 25, 2024 6:03 PM

views 430

विधानसभा निवडणुक : वंचित बहुजन आघाडीचं निवडणूक चिन्ह ‘गॅस सिलिंडर’

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक चिन्ह दिलं आहे. वंचित चे सर्व उमेदवार गॅस सिलिंडर तर प्रहारचे उमेदवार बॅट या चिन्हावर निवडणूक लढवतील. जातीय सेना पक्षाला कोबी हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलंय.

July 16, 2024 6:29 PM July 16, 2024 6:29 PM

views 13

वंचित बहुजन आघाडीची २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा

ओबीसी आरक्षण तसंच अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी येत्या २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत चैत्यभूमी इथून या यात्रेला सुरुवात होणार असून विदर्भ, मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून या यात्रेचा प्रवास होईल. ८ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर इथं यात्रेची सांगता होणार आहे.    एसटी, एससी शिष्यवृत्ती वाढ व्हावी, ओबीसी विद्यार्थ्यांना एसटी एससी शिष्यवृत्ती लागू करावी, तसंच जे कुणबी आहेत त्यांना...